Nashik News : ट्रॅक्टरखाली सापडून ऊसतोड कामगाराच्या चिमुरडीचा मृत्यू

Child Death
Child Deathesakal
Updated on

नाशिक : औरंगाबाद रोडवरील मांडसांगवी येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या (Tractor) चाकाखाली ऊसतोड कामगाराच्या दोन वर्षाच्या मुलीला चिरडल्याची ह्रदयद्रावक घटना शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी घडली. (sugarcane workers 2 year old daughter died due to crushed under wheels of tractor nashik news)

जागृती प्रेमचंद जाधव (२) असे मयत चिमुकलीचे नाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेले प्रेमचंद जाधव त्यांच्या कुटुंबासमेवत उसतोडीच्या टोळीसह मांडसांगवी परिसरात होते. त्यांची दोन वर्षाची मुलगी जागृती त्यांच्यासोबत शेतातच खेळत होती.

जागृतीचे आई -वडील तिला शेताच्या बाजूला सोडून ऊसतोडणी करीत होते. जागृती खेळण्यात मग्न होती. मात्र काळ बनून आलेल्या ट्रॅक्टरचे पुढील चाक जागृतीच्या अंगावरून गेले. ही घटना लक्षात येताच सर्व ऊसतोड कामगारांनी जागृतीच्या दिशेने धाव घेतली.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

Child Death
Rate Hike : टीव्‍ही पाहाण्यासाठी 30 टक्‍के जादा पैसे; चॅनल बंद पडण्याची शक्‍यता

जागृतीचे वडील प्रेमचंद जाधव यांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉ. तडवी यांनी जागृतीला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी आडगाव पोलिसात नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Child Death
Nashik News : बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयातून थेट मुद्रांक नोंदणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Ajra schoolgirl death news
Kolhapur child accident latest news
Ayush Chougule death in Siddhanerli village
Electric Shock Death in Malegaon
Marathi News Esakal
www.esakal.com