Nashik Crime : 'त्या दोघांनी फसवले!' सुसाईड नोट लिहून ५१ वर्षीय व्यक्तीने जीवन संपवलं; आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
Man Found Dead at Home on Makhmalabad Road, Suicide Note Recovered : नाशिकमधील मखमलाबाद रोडवरील ड्रीम कॅसल परिसरात सुदर्शन सांगळे यांनी आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये दोन संशयितांवर आर्थिक फसवणुकीचा उल्लेख असून, पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक: मखमलाबाद रोडवरील ड्रीम कॅसल परिसरातील ५१ वर्षीय व्यक्तीने सुसाईड नोट लिहीत राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दोघा संशयितांनी आर्थिक फसवणूक केल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केलेला आहे.