नाशिक : आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीची आत्महत्या

जागतिक आदिवासी दिनाच्या तोंडावरच विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने याबाबत सर्वत्र चर्चा होत आहे.
Suicide of a student in a tribal ashram schools in nashik district
Suicide of a student in a tribal ashram schools in nashik districtesakal

नाशिक : चोळमुख (ता.पेठ) येथील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत शिकत असलेल्या १६ वर्षीय आदिवासी विद्यार्थिनीने वसतिगृहामध्ये गळफास घेत आत्महत्या केली. भारती महादू गायकवाड असे तिचे नाव आहे. शनिवारी (ता.६) पहाटेच्या सुमारास ही घटना उघड झाली. जागतिक आदिवासी दिनाच्या तोंडावरच विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने याबाबत सर्वत्र चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

Suicide of a student in a tribal ashram schools in nashik district
नाशिक : मनोरुग्ण महिलेची झाडाला गळफास घेत आत्महत्त्या

चोळमुख येथे आदिवासी विकास विभागाची आश्रमशाळा आहे. तेथे दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या भारती महादू गायकवाड हिने शनिवारी (ता.६) पहाटेच्या सुमारास वसतिगृहामध्ये गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. विद्यार्थिनीच्या आत्महत्येचे वृत्ते समजताच नाशिक प्रकल्प कार्यालयातर्फे चौकशीसाठी पथक शाळेवर पाठविण्यात आले आहे. आत्महत्येचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान या विद्यार्थिनीच्या आत्महत्येस शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक हेच जबाबदार असल्याचा आरोप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा कार्याध्यक्ष गणेश गवळी यांच्याकडून करण्यात आला आहे.

Suicide of a student in a tribal ashram schools in nashik district
नाशिक शहरात तापाची ‘फणफण’; 3 हजार रुग्णांची नोंद

मुख्याध्यापक, अधीक्षक हे शाळेत विद्यार्थ्यांकडून शिक्षणाशिवाय साफसफाईची कामे करवून घेत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. संघटनेतर्फे सातत्याने प्रकल्प कार्यालय, अपर आदिवासी आयुक्त यांच्याकडे मुख्याध्यापकांविरुद्ध तक्रार देखील करण्यात आली होती. संबंधित मुख्याध्यापकांविरुद्ध अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर याची चौकशी करण्याच्या सूचना अपर आयुक्त कार्यालयाकडून प्रकल्प कार्यालयास देण्यात आल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com