

Suitcase Murder Case Cracked: Police Reveal Motive Behind Lover’s Killing
sakal
पंचवटी : महिलेचा खून करून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये कोंबून तपोवनातील केवडीबन भागात फेकल्याची घटना उघडकीस आली होती. या मृत महिलेची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान होते. मात्र, आडगाव आणि उपनगर पोलिसांनी संयुक्तरीत्या अवघ्या ७२ तासांत खुनाचा छडा लावला आहे. चारित्र्याच्या संशयावरून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांनी संशयिताला थेट मंगळूरमधून ताब्यात घेतले आहे.