कसबे सुकेणे- मौजे सुकेणे (ता. निफाड) ते चांदोरी फाटा या जवळपास पाच किलोमीटरच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अरुंद रस्ता, मोठमोठे खड्डे, दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात पडलेल्या टपऱ्या यामुळे हा रस्ता वाहतूकदारांसाठी जीवघेणा ठरत आहे. रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.