Sula Fest
sakal
नाशिक: येथील सुला विनयार्ड्सतर्फे आयोजित सुला फेस्ट हा जागतिक स्तरावरील संगीत महोत्सव २०२६ मध्येही संगीतप्रेमींसाठी येणार आहे. यावर्षीच्या हंगामातील महोत्सवाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर सातत्यपूर्ण आयोजनाचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या या महोत्सवात कोणते कलावंत सादरीकरण करणार याकडे रसिकांचे लक्ष लागून राहिले आहे.