World Environment Day : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘सुला'तर्फे पर्यटकांना रोपे भेट | Sula presents saplings to tourists on occasion of World Environment Day nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SULA Vineyard

World Environment Day : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘सुला'तर्फे पर्यटकांना रोपे भेट

World Environment Day : सुला विनियाडर्समध्ये लाल, पांढऱ्या आणि गुलाबी वाइनइतके निसर्गाच्या हिरवाईला महत्व दिले जाते. आसपासच्या परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये ३० हजारांहून अधिक भारतीय झाडांची लागवड करत त्यांची देखभाल केली जात आहे.

यंदाच्या जागतिक पर्यावरणदिनानिमित्त पाचशे झाडे लावण्यात येणार आहे. सर्व पर्यटकांना रोपे भेट देण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. (Sula presents saplings to tourists on occasion of World Environment Day nashik news)

सुला' मध्ये ६० टक्क्यांहून अधिक ऊर्जेची गरज सौर ऊर्जेवर भागवण्यात येते. गेल्या काही वर्षात द्राक्षबागेत सौर पंप बसवून सिंचनासाठी डिझेलचा वापर कमी केला. सुलाच्या सर्व प्रकल्पांवर पावसाच्या पाण्याचे संकलन केले जाते.

पाण्याचा एक थेंब वाया जात नाही. सर्व वापरलेले पाणी प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी सिंचन आणि ‘कुलिंग टॉवर'मध्ये वापरले जाते. पॅकेजिंग सामग्रीपैकी ९९ टक्के सामग्री ही पुनर्वापर करण्यायोग्य आहे.

कच्च्या मालाची स्थानिक पातळीवर उपलब्धता निर्माण करण्यात आणि हलक्या वजनाच्या बाटल्यांचा वापर करून पॅकेजिंग सामग्रीचे अनुकूल पद्धतीने नियोजन करण्यात यश मिळवले आहे.

सुलाने इंटरनॅशनल वाईनरीज फॉर क्लायमेट ऍक्शनचे (आयडब्लूसीए) रौप्य सदस्यत्व प्राप्त केले. आयडब्लूसीएमध्ये समावेश होणारी सुला ही आशियातील पहिली वायनरी आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ठळक नोंदी

० सौर ऊर्जेला प्रोत्साहन, कार्यक्षम पाण्याची साठवणूक, पॅकेजिंगचा पुनर्वापर आणि घनकचरा व्यवस्थापन

० ‘सिंगल युज' प्लास्टिकचा वापर पूर्णपणे कमी केला

० रिसॉर्टमधील प्रसाधनगृहांमध्ये पुन्हा वापरता येण्याजोगे आणि पुन्हा भरता येण्यायोग्य ‘डिस्पेंसर'चा वापर

० रेस्टॉरंटमध्ये प्लॅस्टिकच्या स्ट्रॉची जागा बायोडिग्रेडेबल राइस स्ट्रॉने घेतली

० पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या विकल्या जात नाहीत