World Environment Day : नाशिकच्या देवराईत बहरणार ‘आमराई’

World Environment Day News
World Environment Day Newsesakal

Nashik News : आंब्याच्या असंख्य जाती असून त्यांची नावेही देखील आजच्याच नव्हे तर आपल्या आधीच्या पिढ्यांना ठाऊक नसावेत.

अशाच दुर्मिळ झालेल्या, तर काही काळाच्या ओघात नष्ट झालेल्या विविध जातींची आमराई नाशिकच्या ‘देवराई’त बहरणार आहे.

देवराईच्या डोंगरावर सुमारे दोन एकरामध्ये बहरणाऱ्या आमराईमध्ये विविध जातींच्या आंब्यांच्या रोपांची लागवड उद्या (ता. ५) जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्‍वभूमीवर केली जाणार आहे. (World Environment Day Amrai blossom in Nashik Devrai Plants of rare and endangered species will be planted Nashik News)

गावरान आंब्याची चवच न्यारी असते. मात्र काळाच्या ओघात या आंब्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे जतन करण्यासाठी पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड यांची ‘आपलं पर्यावरण’ ही संस्था पुढे सरसावली आहे.

वनविभाग आणि आपलं पर्यावरण संस्था यांच्या माध्यमातून शिवाजीनगरमधील देवराईतील दोन एकर परिसरात ही आमराई बहरणार आहे. तेथे दुर्मिळ होत चाललेल्या आंब्यांच्या सुमारे बारापेक्षा अधिक प्रजातींच्या रोपांची लागवड केली जाणार आहे.

येत्या काही दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने या आमराईत सुमारे ७०० आंब्यांच्या रोपांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले जाणार आहे. यामुळे येत्या काळात नाशिककरांना दुर्मिळ होत चाललेल्या आंब्यांच्या विविध जातींची चवही चाखायला मिळणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

World Environment Day News
Marathi News Live Update: राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता! शिंदे-फडणवीसांच्या दिल्ली भेटीत चर्चा झाल्याची माहिती

देवराईत २८ हजार झाडे

सोमवारी (ता. ५) जागतिक पर्यावरण दिन आहे. जगभर पर्यावरण वाचविण्यासाठी प्रबोधन केले जाते. नाशिकच्या शिवाजीनगर परिसरात फाशीच्या डोंगरावर एका ध्येयवेड्या पर्यावरणप्रेमीने गेल्या आठ वर्षांमध्ये ‘देवराई’ वसविली आहे.

५ जून २०१५ रोजी वनविभागाच्या सहकार्याने पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड यांनी ‘आपलं पर्यावरण’ या संस्थेच्या माध्यमातून प्रादेशिक विविध जातींच्या ११ हजार रोपांची लागवड केली. आज ८ वर्षांमध्ये या देवराईत तब्बल २८ हजार प्रादेशिक झाडे उभी राहिली आहे. कधीकाळचा ओसाड फाशीचा डोंगर आज देवराई नावाने ओळखला जातो.

या जातींचे आंब्याची लागवड

कुयरी, श्रीखंड्या, गोटी, शेंद्रया, कवट्या, लोणच्या यासह सुमारे १२ प्रकारच्या दुर्मिळ जातींच्या आंब्याच्या रोपाची लागवड केली जाणार आहे. यात चंद्रपूर, मालेगाव (जि.नाशिक) आणि नाशिकच्या द्वारका परिसरात असलेल्या दुर्मिळ असलेल्या आंब्याच्या कोयींपासून रोपे तयार करून त्यांचीही लागवड या आमराईत केली जाणार आहे.

World Environment Day News
Pune News: पुण्यात बैलगाडा शर्यतीवेळी दुर्घटना; घटनेत एकाचा मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी

दुर्मिळ कोयींसाठी आवाहन

गावरान म्हणून ग्रामीण भागात ओळखला जाणाऱ्या आंब्याच्या कोयी मिळत नाहीत. ग्रामीण भागातही अशी गावरान आंब्यांची झाडे नष्ट होत चालली आहेत.

त्यामुळे कोणाकडे त्यांच्याकडे असलेल्या गावरान आंबा असेल तर त्याच्या कोयी ‘आपलं पर्यावरण’ या संस्थेकडे पोहोच कराव्यात.

जेणे करून या कोयींपासून रोपे तयार केली जातील. तीच रोपे आमराईमध्ये लावली जातील आणि अशारितीने दुर्मिळ होत चाललेल्या गावरान आंब्यांचे जतन करता येणार आहे. त्यासाठी शेखर गायकवाड (९४२२२६७८०१) यांच्याकडे संपर्क साधावा.

"‘देवराई’ तील दोन एकरावर दुर्मिळ प्रजातीच्या आंब्याची आमराई करण्यासाठी पर्यावरण दिनी संकल्प केला आहे. पर्यावरणप्रेमी नाशिककरांच्या मदतीने हा संकल्प पूर्ण होईल. आपल्याकडेही गावरान म्हटल्या जाणाऱ्या आंब्यांच्या कोयी असतील तर त्या आंब्याचा फोटो काढून कोय रोप तयार करण्यासाठी आम्हाला द्यावी. त्याचे रोप करून ते आमराईत लावले जाईल."

- शेखर गायकवाड, पर्यावरणप्रेमी, आपलं पर्यावरण.

World Environment Day News
Nashik News : शिक्षकांच्या वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा सुरू; या तारखेपर्यंत नोंदणीस मुदत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com