esakal | 'सुला विनियार्ड'ची कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी एक कोटींची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

Sula Vineyard donates Rs 1 crore for corona fight

'सुला विनियार्ड'ची कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी एक कोटींची मदत

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : येथील सुला विनियार्डसतर्फे (Sula Vineyard) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविरुद्धच्या लढ्यासाठी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यातील प्रत्येकी तीस लाख रुपये ‘पीएम केअर' (PM Care Fund) आणि महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री मदत निधीसाठी (chief minister relief fund) , तर दहा लाख रुपये कर्नाटक मुख्यमंत्री निधीसाठी तत्काळ देण्यात येतील. उरलेले तीस लाख रुपये नाशिकमधील नाशिकमधील स्थानिक मदतकार्य आणि सी. एस. आर. (CSR) प्रकल्पांसाठी पुढील महिन्यात देण्यात येतील. (Sula Vineyard donates Rs 1 crore for corona fight)

हेही वाचा: नाशिकमध्ये ‘टॉसिलिझुब’ इंजेक्शनचा काळा बाजार! फार्मसीचे 2 विद्यार्थी ताब्यात

सुला विनियार्डसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव सामंत यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की देशात थैमान घालत असलेल्या कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेशी लढा देण्यासाठी देशातील जबाबदार नागरिकांनी लवकर पुढे येणे गरजेचे आहे. मदत कार्यात हातभार लावण्यासाठी आम्ही तत्काळ १ कोटी रुपयाचा निधी देत आहोत. सुला विनयार्डस कार्यरत असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यात या निधीचा फायदा होऊ शकेल. विषाणू संसर्गाशी पुढे होऊन दोन हात करणाऱ्या योद्धांना आम्ही सहकार्य करत आहोत. या लढ्यात आम्ही जनतेसोबत आहोत. देणगी देण्याचे हे पाऊल म्हणजे कंपनीकडून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठीचा एक महत्वाचा प्रयत्न आहे.

‘सुला‘तर्फे गेल्यावर्षी 'पीएम केअर' आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीसाठी २० लाख रुपयांची देणगी दिली होती. देशभरात काम करणाऱ्या कंपनीच्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाच्या चांगल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी कंपनीने 'वी केअर' हा कार्यक्रम सुरु केला. तसेच सर्व कर्मचाऱ्यांचा कोरोना प्रतिबंधक लशीचा खर्च ‘सुला‘तर्फे केला जाणार आहे.

हेही वाचा: नाशिकमध्ये दोन दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा; केंद्रांवर गर्दी