Nashik Onion News : मालेगावच्या दक्षिण पट्ट्यातही उन्हाळ कांदा लागवडीची धूम

तालुक्यासह ‘कसमादे’त नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उन्हाळ कांदा लागवडीची धूम आहे.
Labor during onion cultivation.
Labor during onion cultivation. esakal

Nashik Onion News : तालुक्यासह ‘कसमादे’त नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उन्हाळ कांदा लागवडीची धूम आहे. दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जाणारा तालुक्यातील दक्षिण पट्ट्यातील निमगाव, निंबायती, खायदे, गिलाणे, निमगुले, मळगाव, मथुरपाडे, येसगाव आदी गावांमध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.

खायदेसह विविध गावातील शेतकऱ्यांनी गहू, हरभरा या पारंपारिक रब्बी पिकांकडे पाठ फिरवली आहे. (Summer onion cultivation is start in southern of Malegaon nashik onion news)

कुटुंबासाठी लागेल तेवढ्या गव्हाची पेरणी करण्याकडे परिसरातील शेतकऱ्यांचा कल दिसून येतो. पाण्याची कमतरता लक्षात घेता शेतकऱ्यांनी ‘इनलाईन’ व ठिबक सिंचनाद्वारे कांद्यास पाणी देण्याचे नियोजन केले आहे. निर्यातबंदीनंतर ढासळलेल्या भावाचा अंदाज घेत, शेतकरी कांदा लागवड करीत आहेत.

मालेगावच्या दक्षिण पट्टा भागात बहुतांशी शेतकरी खरिपाची पिके घेतात. गेल्या चार वर्षांपासून समाधानकारक पाऊस होत असल्याने दुष्काळी पट्ट्यातील या भागात गहू, हरभरा या रब्बी पिकांसोबत उन्हाळ कांद्याचे उत्पन्न घेतले जाते. शेततळे व विहिरींना बऱ्यापैकी पाणी असल्याने शेतकऱ्यांची उन्हाळ कांद्याच्या लागवडीची सर्वत्र लगबग सुरु आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा लागवड लांबणीवर पडली होती. एकावेळी सर्वत्र शेतकऱ्यांनी कांदा लागवडीची धावपळ होत असून मजूर टंचाई जाणवू लागली आहे. अवर्षणग्रस्त व दुष्काळी गावातून ठेकेदारांतर्फे खास वाहनातून मजूराची ने-आण करीत कांदा लागवड केली जात असल्याचे खायदे येथील शेतकरी डॉ. कौतिक पवार यांनी सांगितले.

Labor during onion cultivation.
Nashik Onion News : उद्यापासून मुंगसे कांदा बाजार सुरु होणार; उन्हाळी कांद्याची आवक वाढणार

पिंपराळे, साकोरी, वाखारी, निंबायती, धनेर आदी गावातून मजूर आणले जात आहेत. कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती, त्यातच अवकाळी पावसामुळे शेती व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे.

बाहेरगावाहून आणण्यात येणारे मजूर, त्यांची वाढलेली मजुरी, महागडी खते, बुरशीजन्य रोगांवरील फवारणी खर्च, सतत होणारा वातावरणातील बदल, कमी दाबाने होणारा वीजपुरवठा या सारख्या अडचणींना तोंड देत कांदा लागवड सुरु आहे.

सरकारने कांदा निर्यातबंदी मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी निंबा जगताप, साखरचंद पवार, सागर जगताप, गोकुळ पवार, दिनेश पवार, सचिन पवार, जितेंद्र पवार, राजू पवार, सुनील जगताप, राहुल जगताप, प्रभाकर पवार, दिनेश सोळुंकी, अशोक देवरे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

Labor during onion cultivation.
Nashik Onion News: देवळ्यात कांद्याच्या क्षेत्रात 17 हजार हेक्टरने घट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com