Nashik Onion News: देवळ्यात कांद्याच्या क्षेत्रात 17 हजार हेक्टरने घट

Cultivation of onion on rainwater and well and borewell water.
Cultivation of onion on rainwater and well and borewell water.

Nashik Onion News : कांद्याचे आगार देवळा तालुक्यात यंदा दुष्काळामुळे कांदा लागवडीत मोठी घट झाली आहे. कांदा उत्पादकांनी उपलब्ध पाण्यावर यंदा आत्तापर्यंत उन्हाळ कांद्याची लागवड ४ हजार ४११ हेक्टरवर केली आहे. शाश्‍वत पाण्याअभावी गेल्यावर्षीच्या तुलनेत १७ हजार हेक्टरने कांदा लागवडीखालील क्षेत्र घटले आहे.

कसमादे पट्ट्यात नगदी पीक म्हणून कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. त्यात देवळा तालुक्यात कमी पाण्यावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. (Onion area decreased by 17 thousand hectares in Deola nashik news)

गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यात २१ हजार ३६४ हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. परंतु, यंदा तालुक्यात ६८ टक्के इतका पाऊस झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती आहे. यंदाचे वर्षे शेतकऱ्यांसाठी मारक ठरले असून कांदा लागवडीवर मोठा परिणाम झाला आहे.

पाण्याची कमतरता लक्षात घेता, त्यातील निम्मे कांदा उत्पादन शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, इनलाइनद्वारे कांद्याला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. सिंचनाच्या माध्यमातून पाण्याची मोठी बचत होते. घटलेल्या कांदा क्षेत्राचा शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होणार आहे. कमी लागवडीमुळे तालुक्यातील कांदा उत्पादकांचे आर्थिक समीकरण बिघडणार आहे.

बोअरवेल खोदण्याचा धडाका

लागवड केलेला कांदा जगावा यासाठी शेतकरी बोअरवेल खोदत पाणी शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी शेतकरी एकापाठोपाठ दुसरे बोअरवेल खोदत आहेत.

Cultivation of onion on rainwater and well and borewell water.
Nashik Onion Purchase: ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’ची खरेदी देखावाच! केंद्राची जाहिरात, मात्र दोनच केंद्रे सुरू

त्यामुळे बोअरवेल व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. सध्या ८३ ते ८५ रुपये फूट असा बोअरवेल खोदण्याचा दर आहे. त्यामुळे अडीचशे ते तीनशे फूट खोल खोदण्यासाठी बोअरवेलचा खर्च शेतकऱ्यांना २३ ते २५ हजार रुपये इतका करावा लागत आहे.

"दुष्काळाचा कांदा लागवडीवर मोठा परिणाम झाला आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पिके बाधित झाली आहेत. नुकसानीचे पंचनामे केले आहेत. पाण्याअभावी कांदा लागवड क्षेत्रात घट झाली आहे." - सीताराम चौधरी, तालुका कृषि अधिकारी, देवळा

"यंदा पावसाने अवकृपा केल्याने कांदा लागवडीवर मर्यादा आल्या आहेत. ऊस, डाळिंबाला पर्याय म्हणून आमचे कांदा हेच नगदी पीक आहे. मात्र पावसाअभावी कांद्याचे उत्पादन मिळणार नसल्याने आर्थिक संकट उभे राहिले आहे." - दादाजी भामरे, खुंटेवाडी

Cultivation of onion on rainwater and well and borewell water.
Nashik Onion Price Fall: कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांची विक्रीसाठी धावपळ; मुंगसेमध्ये 19 हजार क्विंटल आवक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com