Summer Puja : चांदीच्या गणेश मूर्तीला चंदनाची उटी! 21 किलो चंदन, 51 किलो मोगऱ्याची फुले वापरात

On Sunday, the silver Ganesha at Karanja was coated with 21 kg of sandalwood due to the heat. Floral decoration of mogra around.
On Sunday, the silver Ganesha at Karanja was coated with 21 kg of sandalwood due to the heat. Floral decoration of mogra around.esakal

Summer Puja : शहरात तापमानाचा पारा वाढतच असल्यामुळे उन्हाचा दाहकता कमी झालेली नाही. त्यामुळे रविवार कारंजा येथील चांदीच्या गणेश मूर्तीला चंदनाची उटी लावण्यात आली आहे. तर गाभाऱ्यात मोगऱ्याच्या माळा लावल्या आहेत.

जवळपास २१ किलो चंदन आणि ५१ किलो मोगराची फुले वापरण्यात आली आहेत. चंदन आणि मोगऱ्यामुळे गाभाऱ्यात सुगंध दरवळत असून गाभाऱ्यात शीतलता निर्माण झाली आहे. (Summer Puja Sandalwood cover to chandicha ganpati 21 kg of sandalwood 51 kg of mogra flowers nashik news)

नाशिकचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या समीप असल्याने दिवसभर कडक उन्ह जाणवते. दिवसा घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अंगाची लाही लाही होत असताना शहरातील चांदीच्या गणपतीला उन्हाच्या दाहकतेपासून वाचविण्यासाठी चंदनाचा लेप लावण्यात आला आहे.

उन्हाच्या या तडाख्यापासून बचावासाठी मंदिरातील मूर्तींना संरक्षण मिळावे यासाठी चंदनाचा लेप लावण्यात आला असून वैशाख वणवा सुरू झाल्यानंतर हा चंदनाचा लेप लावण्याची अनोखी परंपरा आहे.

नाशिक शहरातील रविवार कारंजा येथे असलेल्या सुप्रसिद्ध चांदीच्या गणपतीला तब्बल २१ किलो चंदन उटीचा लेप लावण्यात आला आहे. पहाटे चांदीच्या गणपती मंदिरात चंदन उटी मोगरा महोत्सव साजरा करण्यात आला. ५१ किलो मोगऱ्याचा समावेश आहे. विधीवत पूजा करुन हा लेप लावण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

On Sunday, the silver Ganesha at Karanja was coated with 21 kg of sandalwood due to the heat. Floral decoration of mogra around.
Summer Shopping: उन्हाळ्यात खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी, डिहायड्रेशनपासून मिळेल आराम

असा पार पडला मोगरा महोत्सव

चांदीच्या गणपती मूर्तीची दाहकता कमी व्हावी, यासाठी पारंपारिक पद्धतीने मृदू, पवित्र चंदन उटी केली जाते. या पार्श्वभूमीवर गाभाऱ्यात रंगीबेरंगी व सुगंधी फुलांची सजावट करण्यात आली.

रविवारी (ता.१४) पहाटे साडेपाचच्या सुमारास अभिषेक झाल्यानंतर, गणरायाच्या मूर्तीला मंत्रोच्चाराच्या घोषात विधीवत चंदन उटीचा लेप लावण्यात आला. दुपारी बाराला महापूजा झाल्यानंतर चांदीच्या गणपतीला महानैवेद्य दाखविण्यात आला.

On Sunday, the silver Ganesha at Karanja was coated with 21 kg of sandalwood due to the heat. Floral decoration of mogra around.
हे ड्रिंक्स प्यायल्याने त्वचा होईल चमकदार! Summer Drinks

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com