Summer Temperature : मालेगावला हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद; पारा @42 अंश सेल्सिअसवर

Due to rising temperature on the busy road from Ekatmata Chowk to College Stop, it was 5 pm
Due to rising temperature on the busy road from Ekatmata Chowk to College Stop, it was 5 pmesakal

Summer Temperature : शहर व परिसरात बुधवारी (ता.१९) या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या पाऱ्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळित झाले असून पारा ४२ अंश सेल्सिअसवर गेला आहे. (Summer Temperature Malegaon recorded highest temperature of season mercury 42 degrees Celsius nashik news)

मागील आठवड्यापासून शहरातील तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. यापूर्वी शहरात शनिवारी (ता. १५) या हंगामातील सर्वाधिक ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. बुधवारी (ता. १९) हंगामातील सर्वोच्च ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

पश्‍चिमी उष्ण वाऱ्यामुळे तापमानाचा पारा वाढला असून नागरिकांनी उन्हापासून काळजी घ्यावी असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. वाढत्या तापमानामुळे शहरातील जनजीवन विस्कळित झाले असून मुख्य रहदारीच्या रस्त्यांवर सायंकाळी पाचपर्यंत शुकशुकाट होता.

दरम्यान वाढत्या तापमानामुळे यावर्षी उन्हाळ्यात प्रथमच शीतपेय, रसवंतीगृह, मसाले ताक, आइस्क्रीम, लिंबू शिकंजी, ज्यूस सेंटर, बर्फगोळे, लस्सी, कुल्फी आदी दुकानांवर आता नागरिकांची गर्दी दिसून येऊ लागली आहे.

अवकाळी, गारपीट, ढगाळ हवामान, सोसाट्याचा वारा यामुळे गेली दोन आठवडे या व्यावसायिकांना मोठा फटका बसला होता. हंगामात या आठवड्यात प्रथमच उन्हाच्या झळांची जाणीव झाली. व्यवसायात वाढ झाल्याचे बहुसंख्य शीतपेय विक्रेत्यांनी सांगितले.

एरवीही शहर व परिसरात दरवर्षी मार्चमध्येच तापमान ४० अंशावर पोचते. यावेळी बदलत्या हवामानामुळे मार्चमध्ये पारा ३५ अंशाच्या आसपासच होता. १२ एप्रिलपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Due to rising temperature on the busy road from Ekatmata Chowk to College Stop, it was 5 pm
Nashik Summer Heat Rise : सलग तिसऱ्या दिवशी मालेगावचा पारा चाळिशी पार

वाढत्या तापमानामुळे शहरवासीयांनी आज प्रामुख्याने घरात बसणे पसंत केले. अत्यावश्‍यक काम असल्यासच गृहिणी व नागरिक बाहेर पडताना आढळून आले.

वाढत्या तापमानामुळे कॅम्प रोड, सटाणा रोड, कॉलेज रोड, चर्चगेट, रावळगाव नाका या पश्‍चिम भागासह पूर्व भागातील आझादनगर, साठफुटी रस्ता, जुना आग्रा रस्ता या प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांवर अक्षरश: शुकशुकाट होता. अनेकांनी घर व आस्थापना गाठण्यासाठी रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घेतला.

उष्माघात कक्ष सुरु

उत्तर महाराष्ट्रातील वाढत्या तापमानाच्या पाश्‍र्वभूमीवर येथील सामान्य रुग्णालयात यापूर्वी दोन स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरु करण्यात आले आहेत. अद्याप रुग्णालयात उष्माघाताचा एकही रुग्ण दाखल झाला नाही.

नागरिकांनी या काळात भरपूर पाणी प्यावे. ताक, लिंबू पाणी, गुळपाणी आदीपेय पदार्थ घ्यावीत. घराबाहेर पडताना गॉगल, टोपी, उपरणे यांचा वापर करावा असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांनीही या काळात शेतीची कामे सकाळी आटोपून घ्यावीत. श्रमाची कामे करणाऱ्या मजुरांनी काळजी घ्यावी. अधिकाधिक व वेळोवेळी पाणी प्यावे असे डॉक्टरांनी सांगितले.

Due to rising temperature on the busy road from Ekatmata Chowk to College Stop, it was 5 pm
Nashik News : साडेसातशे किलो कचऱ्याचे विशेष स्वच्छता मोहिमेतून संकलन; NMC व NCC कॅडेट्सचा उपक्रम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com