नाशिक- शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुट्या लागत असताना प्रवासी संख्येत वाढ होत असते. प्रवाशांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे शुक्रवार (ता. २५)पासून २५ जूनपर्यंत या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी जादा बस उपलब्ध केल्या आहेत. त्यानुसार पुणे, धुळ्याला जाण्यासाठी दर १५ मिनिटांनी बस उपलब्ध असेल.