सातपूर- अन्न व औषध प्रशासनाने तपास यंत्रणेकडून कारवाई झाल्यावर संबंधित दोन्ही ट्रक ताब्यात देण्याची लेखी मागणी सातपूर पोलिसांना केली होती. मात्र, तपास यंत्रणांनी अन्न व औषध प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता कोट्यवधी रुपयांचा सुपारी भरलेला ट्रक परस्पर सोडल्याने या प्रकरणातील तपास यंत्रणाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यामुळे ‘उचे लोग, उची पसंत- सुपारीत खाकीचाही केसरी सुगंध’ अशी उपरोधिक टीका ऐकू येत आहे.