
पोलिस अधीक्षकांकडून कसबे सुकेणेत आढावा; नियमांचे काटेकोर पालनाच्या सूचना
कसबे सुकेणे : येथे पाच दिवसांचा जनता कर्फ्यू सुरू असून, ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी येथे भेट देऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आढावा बैठकीत केल्या. या वेळी त्यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंधांचा आढावा घेतला.
पिंपळगाव बसवंत, ओझर, लासलगाव पाठोपाठ कसबे, सुकेणे येथे कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. त्यादृष्टीने तालुका प्रशासन, ग्रामपालिका प्रशासन, कोरोना कमिटी, प्राथमिक आरोग्य प्रशासन, पोलिस प्रशासनाने राबविलेल्या योजनांची अंमलबजावणी कशी केली आहे. याचा आढावा सचिन पाटील घेत आहेत. कसबे सुकेणे गावाला भेट देऊन काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना केल्या. कसबे सुकेणे ग्रामपालिकेतर्फे केलेल्या उपाययोजनांची माहिती उपसरपंच धनंजय भंडारे व ग्रामविकास अधिकारी रवी अहिरे यांनी दिली. याप्रसंगी डीएसपी भोसले, ओझर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक रहाटे, आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. वैभव पाटील त्यांच्यासह ग्रामपंचायत सरपंच गीता गोतरणे, उपसरपंच धनराज भंडारे, ग्रामसेवक रवी अहिरे, छगन जाधव, रमेश जाधव, बाळू कर्डक, सुहास भार्गवे, अतुल भंडारे, सोमनाथ भागवत, छबू काळे, शिल्पा जाधव, ज्योती भंडारे, मनीषा भंडारे, सविता जाधव, सुरेखा औसरकर, सरला धुळे, आरती कर्डक, छाया गांगुर्डे, आबेदा सय्यद, मंडल अधिकारी तांबे, तलाठी कल्पना पवार, नोडल अधिकारी एकनाथ पगार, किशोर कर्डक, सचिन कुलथे, बापू भंडारे उपस्थित होते.
हेही वाचा: होम क्वारंटाईन कोरोनाबाधितांसाठी ‘आयएमए’तर्फे ‘नाशिक कोविड हेल्पलाइन’
Web Title: Superintendent Of Police Reviews Corona Situation At Kasbe Sukene Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..