politics
politicsesakal

करायला गेले एक अन् झाले भलतेच, खासदार सुळेंनी मनसेचे टोचले कान

सर्वांना राजकीय मतभेद वेगळे ठेवून देशाचा विचार करावा लागणार आहे.
Published on

मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झालं आहे. मशिदींवरील भोंगा आणि हनुमान चालीसा पठण करण्यावरून वातावरण आणखी तापलं आहे. करायला एक गेले झाले भलतेच आणि त्याचा परिणाम शिर्डीचा भोंगा पहिले खाली आला, अशी प्रतिक्रिया भोंगा प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) भोंग्यांविरोधातील आंदोलनाबाबत (Raj Thakre Agitation) त्यांनी ही प्रतिक्रीया व्यक्त केली. त्या नाशिक येथे बोलत होत्या.

politics
'रोहित बाबा शरद पवारांनी ही संस्कृती...', चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर

यावेळी खासदार सुळे यांनी राज्यातील विविध समस्यांवर भाष्य केल. त्या म्हणाल्या, आज महागाईचा प्रश्न गांभीर्याने घ्यायला हवा. महागाई वाढत जाणार आहे, असे अनेक वेळा प्रधानमंत्री मोदी यांना सांगितले. देश आधी असतो नंतर राजकारण असतं. सर्वांना राजकीय मतभेद वेगळे ठेवून देशाचा विचार करावा लागणार आहे. कोविडमध्ये इंजेक्शन व औषधे घेताना औषध निर्मात्याची आपण कधीच जात पाहत नाही, असेही त्या म्हणाल्या.

विविध क्षेत्रातील उद्योजक व सीए यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधत सरकारी अनुदान असणाऱ्या उद्योगांना सबसिडी संदर्भात विविध अटी शिथिल केले पाहिजे, अशी विनंती केली. या वेळी सुळे यांनी सभागृहात यासंबंधी नक्कीच प्रश्न मांडू, असे आश्‍वासन दिले. दरम्यान, व्यासपीठावर माजी आमदार हेमंत टकले, कोषाध्यक्ष पियुष चांडक, नाशिक शाखा अध्यक्ष सोहील शाह, नाशिक शाखा सचिव संजीवन तांबुळवाडीकर, नाशिक शाखा उपाध्यक्ष राकेश परदेशी, नाशिक शाखा कोषाध्यक्ष जितेंद्र फाफट, ज्येष्ठ सभासद शिवदास डागा उपस्थित होते.

politics
"मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला ठाम विश्वास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com