सुरगाणा- वणी- सुरगाणा रस्त्यावरील उमरेमाळ येथील नवविवाहिता कावेरी योगेश जाधव (वय २०) हिचा मृतदेह घरालगत असलेल्या शेततळ्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तिच्या नातेवाइकांनी यामागे घातपाताचा संशय व्यक्त केला. पोलिसांना तिच्या वहीत सापडलेली चिठ्ठी तिची नसल्याचा दावा नातेवाइकांनी केला असून, पोलिस हस्ताक्षराची तपासणी करीत आहेत.