नाशिक- बहुप्रतिक्षित सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाचे काम लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. शिर्डी येथे केंद्रीय भूपृष्ठवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी एका महिन्यात या महामार्गाच्या प्रकल्पास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल, असे स्पष्ट केल्याने आशा उंचावल्या आहेत. या प्रस्तावित महामार्गाचे काम भूसंपादनाअभावी रखडले होते. मात्र आता या प्रकल्पाला पुन्हा एकदा गती मिळेल, अशी चिन्हे दिसत आहे. या महामार्गाच्या प्रकल्पाचा प्रस्ताव कॅबिनेटच्या समोर ठेवण्यात आला असून, पुढील महिन्यात त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.