Surgana News : सुरगाणा येथे दुर्दैवी घटना; मुलीकडे निघालेल्या वृद्ध महिलेचा पुरात वाहून मृत्यू
Surgana Woman Drowns in Nar River Flood : सुरगाणा तालुक्यातील हातरुंडीपैकी तळपाडा येथे नार नदीच्या पुरात वाहून गेलेल्या ६५ वर्षीय दिव्यांग महिला सुरतीबाई चिमण दळवी यांचा मृतदेह कोल्हापूर बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटमध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आला.
सुरगाणा: अलंगुणजवळील हातरूंडीपैकी तळपाडा येथील सुरतीबाई चिमण दळवी (वय ६५) या दिव्यांग महिलेचा नार नदीच्या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. ही महिला २१ ऑगस्टला दातरीचापाडा येथे मुलीकडे जाण्यासाठी निघाली होती.