Surgana Earthquake : जमिनीत गूढ आवाज अन् भांडीकुंडी पडली खाली; उंबरठाण परिसरात भूकंपाने उडाली धांदल

Mild Earthquake Tremors Reported in Surgana Taluka : सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Surgana Earthquake

Surgana Earthquake

sakal 

Updated on

सुरगाणा: तालुक्यातील पश्चिमेकडील उंबरठाण परिसरातील निंबारपाडा, चुली, राशा, गुही, उंबरठाण, गोंडाळविहीर या भागात तीन ते चार दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. या भागात जमिनीतून मोठे आवाज ऐकू येत असून, घरावरील पत्रे हलले. काही घरात मांडणीवरील भांडी कुंडी, डबे खाली पडले होते. उंबरठाण येथे सौम्य धक्का बसल्याने जमीन हादरल्याने अनेक जण घरातून बाहेर पडले. वर्दळ असल्याने काहींना धक्के जाणवले नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com