आदिवासी भागात कोरोनावरील उपचारासाठी ‘सुरगाणा पॅटर्न’ प्रभावी

chhagan bhujbal
chhagan bhujbalesakal

नाशिक : कोरोनाविषयी (Corona Virus) असलेले गैरसमज व भीतीमुळे उपचारासाठी आदिवासी बांधव पुढे येत नव्हते. अशावेळी आदिवासी बांधवांचा ज्या उपचार पध्दतीवर विश्वास व उपचार घेण्याची तयारी आहे, अशी आयुर्वेदीक उपचार पध्दती सुरगाण्यासारख्या आदिवासी भागात पोहचवून आदिवासी बांधवावर उपचार करण्यात आले. या माध्यमातून कोरोनामुक्तीचा ‘सुरगाणा पॅटर्न’ आदिवासी भागात प्रभावी ठरला आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. (Surgana-pattern-effective-for-corona-treatment-in-tribal-areas-chhagan-bhujabal-nashik-marathi-news)

आयुर्वेदीक उपचार पध्दती ठरली वरदान

भुजबळ फॉर्म येथे ‘सुरगाणा पॅटर्न’ यशस्वीपणे राबविणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील वैद्यकीय क्षैत्रातील मान्यवरांचा सत्कार जिल्हा परिषदेच्यावतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आदिवासी भागातील बांधवांना कोरोनावरील उपचार व लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करणे खूप कठीण काम होते. पंरतू आपली वर्षानुवर्षे चालत असलेली आयुर्वेदीक उपचार पध्दती कोरोनाकाळात वरदान ठरली आहे. सुरगाण्यात यशस्वी ठरलेल्या सुरगाणा पॅटर्न शासनापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

chhagan bhujbal
कलियुगातला श्रावणबाळ हरपला..अवघे गाव हळहळले

लढाई अजून संपलेली नसून हा तर 'स्वल्पविराम'

आयुर्वेदाच्या माध्यमातून वैद्य.विक्रांत जाधव यांनी मोठ्या प्रमाणात रुग्णसेवा केली असून ही बाब अतिशय कौतुकास्पद व समाजाला आदर्श देणारी आहे. कोरोनाकाळात सुरगाण्या सारख्या आदिवासी भागात सेवा देणारे सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारीका यांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. परंतू कोरोनाची लढाई अजून संपलेली नसून हा स्वल्पविराम आहे, पुढे येणाऱ्या नवीन आवाहानासाठी सर्वांनी सज्ज राहून आपले काम सुरु ठेवावे, असे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

लोककलेच्या माध्यमातून जनजागृती

कोरोनाकाळात लोककलेच्या माध्यमातून आदिवासी बांधवामध्ये जनजागृती केल्याने अधिक प्रमाणात आदिवासी बांधव लसीकरण व उपचारासाठी पुढे येतांना दिसत असल्याचे चित्र समाधानकारक आहे, असे मतही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर म्हणाले की, सुरगाणा पॅटर्न स्तुत्य उपक्रम आहे. हा उपक्रम आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबविण्यात आला आहे. सुरगाणा पॅटर्न यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले आहे.

chhagan bhujbal
जिल्ह्यातील वीस लाख पशुधनाचे आरोग्य धोक्यात

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नितीन पवार, दैनिक सकाळचे उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक राहूल रनाळकर, वैद्य विक्रांत जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र चौधरी व आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर ‘सुरगाणा पॅटर्न’ यशस्वी करणाऱ्या जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ.रवींद्र चौधरी, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मिलिंद चित्तरवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप रणवीर, डॉ. चैतन्य बैरागी, वैद्यकीय अधिकारी कमलाकर चौधरी, वैद्यकीय अधिकारी योगिता जोपळे, डॉ. राजेश चौधरी, डॉ.सागर पाटील, डॉ. विजय साठे, डॉ.कल्पेश भोये, डॉ.जयेंद्र थविल, सामुदाय आयुष अधिकारी अनिल हिंडे, डॉ.अक्षय पाटील, डॉ.मधुकर पवार, डॉ. विजय देवरे, डॉ.वसंत गावित यांचा सत्कार जिल्हा परिषदेच्यावतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते करण्यात आला.

(Surgana-pattern-effective-for-corona-treatment-in-tribal-areas-chhagan-bhujabal-nashik-marathi-news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com