Bribery Case
sakal
सुरगाणा: सुरगाणा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक उपनिरीक्षक तुळशीराम शिवराम चौधरी (वय ५६, रा. पळसन, ता. सुरगाणा) यांनी हरवलेल्या मुलीचा शोध लावून दिल्याच्या बदल्यात तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने बुधवारी (ता.१०) कारवाई करताना त्यांना सात हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले.