Civil Hospital : जिल्हा शल्यचिकित्सकांकडून कर्मचाऱ्यांची झाडाझडती

civil hospital
civil hospitalesakal

Nashik News : जिल्हा रुग्णालयातील अस्वच्छता आणि कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे नेहमी चर्चेत असलेल्या जिल्हा रुग्णालयाची जिल्हा शल्यचिकित्सकांकडून (District Surgeon) वॉर्डनिहाय अचानक पाहणी करण्यात आली. (surprise ward wise inspection of district civil hospital was conducted by district surgeon nashik news)

यावेळी कामचुकार कर्मचाऱ्यांविरोधात थेट आरोप करण्यात आल्याने जिल्हा शल्यचिकित्सकांनी संबंधितांची झाडाझडती घेत कामकाजात सुधारणा न झाल्यास बदल्या करण्याची तंबी दिल्याने कामचुकारांचे धाबे दणाणले आहे.

दरम्यान, वर्षभरापूर्वी जिल्हा रुग्णालय पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे वर्ग करण्यात आलेले जिल्हा रुग्णालयाचे प्रशासकीय व्यवस्थापन सांभाळण्यास निधीअभावी असमर्थता दर्शविली आहे. तसे पत्रच आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून जिल्हा रुग्णालयास देण्यात आल्याने जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासकीय व्यवस्थापनाची जबाबदारी पुन्हा जिल्हा शल्यचिकित्सकांकडे आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातील अस्वच्छतेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. कंत्राटी कर्मचाऱ्यांसह शासकीय सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून कामकाजात कुचराई केली जात होती. तर, काही कर्मचाऱ्यांकडून कर्तव्यावर असताना गैरवर्तन केले जात होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

civil hospital
NMC News : भूसंपादनाचा निकाल महापालिकेच्या पारड्यात! कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने वाचले 272 कोटी

त्यामुळे याबाबत अनेक तक्रारी जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासकीय व्यवस्थापनाकडे करण्यात आल्या होत्या. त्याबाबत वारंवार ताकीदही संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या जात होत्या. मात्र त्यात फारसा फरक न पडल्याने गुरुवारी (ता.४) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी अचानक वॉर्डनिहाय पाहणी केली.

यावेळी पाहणी करताना प्रत्येक वॉर्डात जाऊन जिल्हा शल्यचिकित्सकांना कर्मचाऱ्यांकडे कामकाजासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी परिचारिकांसह अधिकाऱ्यांनी कामचुकार कर्मचाऱ्यांची नावानिशी तक्रारी केल्या. काही कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाबाबतही थेट लेखी तक्रारी करण्यात आल्याने कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले.

तर, जिल्हा शल्यचिकित्सकांनी यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांना कामकाजात सुधारणा करण्याची ताकीद देत, तसे न झाल्यास शहराबाहेर बदल्या करण्याची तंबी दिली. त्याचप्रमाणे, काही कर्मचाऱ्यांकडून जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील वाहनांचे नुकसान केले जात असल्याची बाब नुकतीच घडली.

civil hospital
Rainwater Harvesting : नाशिक शहरात आता रेन वॉटर हार्वेस्टिंग चळवळ! भूजल पातळी वाढविण्यासाठी निर्णय

त्याचीही गंभीर दखल डॉ. थोरात यांनी घेतली. तसेच, यावेळी वॉर्डनिहाय पुरेसा औषध पुरवठा होत नसल्याचीही बाब परिचारिकांनी डॉ. थोरात यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यासंदर्भात त्यांनी औषध विभागासह भांडारविभागालाही तत्काळ सेवा पुरविण्याचे आदेश दिले आहेत.

व्यवस्थापनाची जबाबादारी पुन्हा डॉ. थोरातांकडे

वर्षभरापूर्वी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे सुपूर्द करण्यात आले होते. त्यानुसार स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

प्रशिक्षणार्थी डॉक्टर्सचा अभ्यासक्रमही सुरू झाला. परंतु जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय कामकाजासाठी पुरेसा निधी नसल्याने प्रशासकीय व्यवस्थापन होत नसल्याचे पत्र डीनच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आले. त्यानुसार सदरचा प्रस्ताव जिल्हा रुग्णालयाने शासनाकडे पाठविला असून, जिल्हा रुग्णालयाची प्रशासकीय व्यवस्थापनाची जबाबदारी पुन्हा जिल्हा शल्यचिकित्सकांकडे आली आहे. तर आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून केवळ वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे अध्यापनाचे कामकाज केले जाणार आहे.

civil hospital
NMC Road Repair : रस्त्यांचे ऑडिट करण्याची मागणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com