Latest Crime News | नाशिक रोडला गावठी पिस्तुलासह संशयितास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suspect along with recovered pistol and officers and staff of Nashik Road Police Station.

Nashik Crime News : नाशिक रोडला गावठी पिस्तुलासह संशयितास अटक

नाशिक रोड: गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका संशयितास नाशिक रोड पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस, असा सुमारे २५ हजार पाचशे रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. (Suspect arrested with Gavathi pistol on Nashik Road Nashik Latest Crime News)

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

हेही वाचा: Nashik Crime News : वणी बसस्थानकानजीक 12 लाख किंमतीचा अवैध विदेशी मद्यसाठा ताब्यात!

गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी विष्णू गोसावी व सागर आडणे यांना गुप्त माहिती मिळाली. ही माहिती त्यांनी वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांना दिली. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गणेश न्हायदे, सहाय्यक निरीक्षक योगेश पाटील व सहकाऱ्यांनी सामनगाव रोडवर असलेल्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानाजवळ सापळा रचला. पोलिसांना बघताच संशयिताने पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले. चौकशीत त्याचे नाव अक्षय गणेश नाईकवाडे, असे असल्याचे निष्पन्न झाले.

त्याची झडती घेतली असता, गावठी पिस्तूल एक जिवंत काडतूस आढळले. कामगिरीबद्दल पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे, निरीक्षक गणेश न्हायदे, राजू पाचोरकर, सहाय्यक निरीक्षक योगेश पाटील, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, सहाय्यक उपनिरीक्षक अनिल शिंदे, अविनाश देवरे, विष्णू गोसावी, सोमनाथ जाधव, सागर आडणे, केतन कोकाटे, संजय बोराडे, अरुण गाडेकर, गोवर्धन नागरे यांचे अभिनंदन केले.

हेही वाचा: Police Recruitment : पोलीस भरती ऑनलाईन अर्जासाठी शेवटचे 2 दिवस; इथे करा क्लिक