Crime Alert | इंदूरमधील 'त्या' संशयितास अटक

suspect in murder from Indore arrested on Jail Road
suspect in murder from Indore arrested on Jail Roadesakal

नाशिक रोड : मध्य प्रदेशातील इंदूर (Indore) येथून खून करून फरार झालेल्या संशयितास उपनगर पोलिसांनी जेलरोड येथील नारायण बापूनगर येथे शिताफीने सापळा रचून अटक केली. संशयिताला अटक केल्यानंतर मध्य प्रदेश (Madhya Pradesh) पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. संशयित नारायण बापूनगरमध्ये येणार असल्याची माहिती हवालदार सुदर्शन बोडके यांना समजली. त्यांनी सदर माहिती वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांना दिली. उपनिरीक्षक लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली बोडके, सहाय्यक उपनिरीक्षक गोडसे, ताजणे, शेख, मढवई व इतरांनी सापळा (Trap) रचला.

suspect in murder from Indore arrested on Jail Road
क्राइम पट्रोल पाहून पुरुषाने केला महिलेच्या खूनाचा प्लान

यादरम्यान, एक जण रस्त्याच्या कडेला असलेल्या आडोशाने पुढे येत होता. चौकशी सुरू केली असता, पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याला शिताफीने अटक केली. त्यांचे नाव सिद्धार्थ सुनील सिंग राठोड (२९) असल्याचे सांगितले. यानंतर उपनगर पोलिसांनी इंदूर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर इंदूर पोलिसांचे एक पथक आले व संशयिताला घेऊन गेले. उपनगर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल पोलिस आयुक्त दीपक पांडे (CP Deepak Pandey) , उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर आदींनी अभिनंदन केले आहे.

suspect in murder from Indore arrested on Jail Road
Society Election| राजापूर सोसायटीची निवडणूक बिनविरोध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com