Nashik Crime News : सोने तारणच्या नावाखाली गंडविणार्यास अखेर अटक

Cheating
Cheatingesakal

नाशिक : एका ठिकाणी सोने तारण ठेवल्याचे सांगून त्यावर दुसर्या गोल्ड फायनान्सकडून पैसे घेत गंडा घालणार्या संशयित तरुणाला अखेर शहर खंडणीविरोधी पथकाने जेरबंद (Arrested) केले. (suspect who claimed to have pledged gold at one place and took money from another gold finance company was arrested nashik crime news)

या संशयित तरुणाने आठवड्यात दोन घटनांमध्ये घेतलेले चार लाखांची रोकड अवघ्या काही दिवसात मौजमजेवर उडविल्याचे तपासातून समोर आले आहे. प्रथमेश उर्फ गुच्छा श्याम पाटील (२५, रा. गाझी गढी, मोदकेश्वर वसाहत, गाडगे महाराज धर्मशाळा, जुने नाशिक) असे संशयित तरुणाचे नाव आहे.

त्याच्याविरोधात पंचवटी व गंगापूर पोलिसात गंडा घातल्याचे गुन्हे दाखल आहेत. सदरील गुन्हयाचा तपास पोलीस ठाण्यासह शहर गुन्हेशाखेच्या खंडणी विरोधी पथकही करीत असताना, पोलीस अंमलदार भगवान जाधव यांना संशयित पाटील हा गोल्फ क्लब मैदान परिसरात येणार असल्याची खबर मिळाली होती.

त्यानुसार, खंडणी विरोधी पथकाने परिसरात सापळा रचला आणि संशयित प्रथमेश पाटील यास अटक केली. पोलीस चौकशीमध्ये त्याने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यास अटक करून गंगापूर पोलिसांच्या ताब्यात अधिक तपासासाठी देण्यात आले आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक बैसाने हे करी आहेत.

सदरची कामगिरी आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली खंडवी विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, सगळे, रोकडे, राजेंद्र भदाणे, चकोर, स्वप्निल जुंद्रे, भगवान जाधव, भूषण सोनवणे, मंगेश जगझाप, सविता कदम यांनी बजावली.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

Cheating
Nashik News : डॉक्टरांचे स्टाफचे परिश्रम फळास आले; अवघ्या 61 दिवसात बाळाचे वजन 975 ग्रॅमने वाढले!

अशी होती मोडस्‌

संशयित प्रथमेशच्या मोबाईलमध्ये बजाज फायनान्सकडे २ लाख रुपयांवर सोने तारण ठेवल्याची एक पावती आहे. गोल्ड लोनचे वैभव होनराव यांना त्याने सदरची पावती दाखवून त्यावर मला किती लोन आपण देऊ शकाल, अशी विचारणा केली.

त्यांनी २ लाखांपेक्षा जादाची रक्कम सांगितल्यानंतर त्याने ते सोने बजाजमधून काढून तुमच्याकडे ठेवतो असे आमिष दाखवतो. बजाज फायनान्समधून सदरील तारण सोने काढून आणण्यासाठी संबंधित फायनान्स कंपनीच्या अधिकार्यांना घेऊन जातो परंतु त्यांना बजाज फायनान्सच्या कार्यालयात घेऊन जात नाही.

‘तुम्हाला ते ओळखतील. तुम्ही फक्त पैसे द्या मी सोने सोडवून आणून तुम्हाला देतो’ असे सांगून तो पैसे घेऊन पसार झाला. असाच प्रकार त्याने मुथुट फायनान्सच्या बाबतीही केला. या दोन्ही प्रकरणात पंचवटी व गंगापूर पोलिसात गुन्हे दाखल आहेत.

मौजमजेवर उधळले पैसे

संशयित प्रथमेश याने अवघ्या एका आठवड्यात असे गंडा घालण्याचे दोन प्रकार करीत चार लाखांची फसवणूक केली. मात्र या रकमेतील एक रुपयांही त्याच्याकडे शिल्लक नाही. मौजमजेवर त्याने चार लाखांची रोकड उडवून टाकल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

Cheating
MPSC Exam : लोकसेवा आयोगाकडून राज्‍यसेवा 2021 ची गुणवत्ता यादी प्रसिद्ध!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com