मोसम नदीकाठावरील स्मशानभूमीलगत तरूणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ : Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dead body found  beside dattatray thackeray

Nashik News : मोसम नदीकाठावरील स्मशानभूमीलगत तरूणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ

जायखेडा, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील मोसम नदी काठावरील स्मशानभूमीलगत सकाळी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता.

दरम्यान काही तासानंतर मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून, पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव दत्तात्रय राजाराम ठाकरे (वय 34, राहणार लाडूद ता. बागलाण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. (Suspicious body of young man found near cemetery on banks of river Mosam Nashik News)

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

जायखेडा स्मशानभूमीलगतच्या मोसमनदी काठावर मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. गाव परिसरात घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी एकच गर्दी केली होती. जायखेडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल घटनेचा आढावा घेतला.

मात्र मृत व्यक्ती कोण कुठला ओळख पटविण्यासाठी जायखेडा पोलिसपुढे मोठे आव्हान ठाकले होते. पोलिसांनी तपासचक्र जोमात फिरल्याने मृत व्यक्ती लाडुद येथील दत्तात्रेय ठाकरे असल्याचे उघड झाले. मृत ठाकरेच्या डोक्यावर व चेहऱ्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा असून, घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी जायखेडा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

जायखेडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम शिरसाठ यांनी पदभार स्विकारल्यानंतर मोसम नदीकाठावर व्यक्ती दत्तात्रय ठाकरे याचा मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली असून या घटनेचा तपास कशा प्रकारे करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Nashikdead body found