Latest Marathi News | हिंगलाजनगर भागात दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू; हत्या की आत्महत्या तपासाचे आव्हान! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aftab Hussain Mohammad Sayed & alkama altab Hussain

Nashik : हिंगलाजनगर भागात दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू; हत्या की आत्महत्या तपासाचे आव्हान!

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील हिंगलाजनगर भागात अलताब हुसेन मोहम्मद सईद व अल्कमा अलताब हुसेन हे दाम्पत्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत मिळून आला. पतीचा मृतदेह जखमी अवस्थेत तर पत्नीचा अर्धवट जळालेल्या स्थितीत घरातच दोन वेगवेगळ्या खोलीत मिळून आल्याने हा हत्येचा की आत्महत्येचा प्रकार हे पोलिसांसमोर तपासासाठी आव्हान आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी (ता.१७) पहाटे हा प्रकार उघडकीस आला. (Suspicious death of couple in Hinglaj Nagar area at malegaon Nashik crime Latest Marathi News)

हेही वाचा: Nashik Crime News : चालकानेच केली 66 लाखांची लूट; वयोवृद्धाला विल्होळीत सोडून पोबारा

या घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, शहर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रिती सावंत सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बारकाईने पंचनामा व घटनास्थळी पाहणी केली. या संशयास्पद मृत्यूचं गूढ उकलण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

अलताब हुसेन मोहम्मद सईद व अल्कमा अलताब हुसेन हे दाम्पत्या हिंगलाज नगरात वास्तव्यास आहे. त्यांच्या राहत्या घरी पहाटेच्या सुमारास त्यांचे मृतदेह आढळून आले. अल्कमा या पत्नीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत तर पती अलताबचा डोक्याला मार लागलेल्या स्थितीत. दोन्ही मृतदेह चिकित्सेसाठी सामान्य रुग्णालयात आणण्यात आले आहेत. शवचिकित्सा अहवालानंतर मृत्यूचा काही प्रमाणात उलगडा होण्यास मदत होईल.

हे वयस्कर दाम्पत्य घरात एकटेच होते यामुळे लुटमार किंवा अन्य उद्देशाने त्यांच्यावर हल्ला व त्यातून खून झाला की काय यासह सर्व शक्यता पोलिसांनी पडताळून पाहण्यास सुरुवात केली आहे. सर्व शक्यता गृहीत धरून चोहोबाजूंनी तपास केला जात आहे. नजीकचे रहिवासी, शेजारी तसेच नातेवाईक यांची चौकशी व जबाब नोंदवून घेतले जात आहे. शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: Nashik : सातपूर भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; चिमुकल्याला चावा घेत फरफटत नेले