स्वामी समर्थ केंद्र पाडण्याची नोटीस

स्वामी समर्थ केंद्र पाडण्याची नोटीस
Published on: 
पान तीन सेकंड मेन -------------- स्वामी समर्थ केंद्र पाडण्याची नोटीस कुंभमेळ्यासाठी लक्ष्मण झुल्याच्या कामात अडथळा; सेवेकरी संतप्त सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदाघाट परिसरात सुरू असलेल्या विकासकामांत लक्ष्मण झुला उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी गोदाकाठी गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राला महापालिकेने जागा रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे. महापालिकेची ही नोटीस मिळताच सेवेकऱ्यांमध्ये संतप्त झाले आहे. हे सेवा केंद्र २० वर्षांपूर्वी तत्कालीन नगरसेवक, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती आणि आयुक्त यांच्या परवानगीने आणि ठरावानुसार स्थापन करण्यात आले होते. गेल्या दोन दशकांपासून येथे बालसंस्कार, सप्ताह, पारायण, प्रकटदिन उत्सव यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. एवढेच नव्हे तर गेल्या तीन वर्षांपासून सेवा मार्गाकडून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता आणि आरोग्य अभियानाचे हे केंद्र प्रमुख केंद्रबिंदू ठरले असून येथूनच देशभरातील स्वच्छता अभियान आणि दरवर्षीचे गंगापूजन केले जाते. त्यामुळे सेवेकऱ्यांची या केंद्राशी घट्ट भावनिक नाळ जुळलेली आहे. महापालिकेच्या पाडकामाच्या नोटिशीचा निषेध करण्यासाठी मंगळवारी सुमारे एक हजार सेवेकऱ्यांनी गोदाकाठवरील केंद्रात ठिय्या आंदोलन करत आध्यात्मिक सेवा सुरू करत महापालिकेच्या निर्णयाला विरोध दर्शवला. सेवेकऱ्यांच्या या आंदोलनाची माहिती मिळताच आमदार देवयानी फरांदे यांच्या वतीने निखिल पवार, सोनाली पवार, विनायक पांडे, ऋतुराज पांडे, अदिती पांडे, अंकुश पवार, मयुरी पवार, बबलू शेलार आणि शाहू खैरे यांनी तातडीने केंद्राला भेट दिली. या केंद्राला कोणत्याही परिस्थितीत पाडू देणार नाही, अशी ठाम ग्वाही त्यांनी यावेळी सेवेकऱ्यांना दिली. सेवेकरी योगेश शिरापुरे यांनी सांगितले की, लक्ष्मण झुल्याचे काम हे केंद्र आहे त्याठिकाणी ठेवूनही पूर्ण होऊ शकते. त्यामुळे महापालिका आणि कुंभमेळा प्रशासनाने सहानुभूतीने विचार करावा आणि धार्मिक भावनांचा आदर राखत केंद्र आहे तसेच ठेवावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com