स्वयंम योजनेच्या भत्त्यांमध्ये ३३ टक्के वाढ

स्वयंम योजनेच्या भत्त्यांमध्ये ३३ टक्के वाढ
Published on: 
‘स्वयंम’ योजनेतील भत्त्यांत भरघोस वाढ अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; भोजन, निवास व निर्वाह भत्त्यांचे सुधारित दर लागू सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतील भत्त्यांमध्ये वाढ करण्यास मंगळवारी (ता.६) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. नव्या दरानुसार विद्यार्थ्यांना ठिकाणानुसार वर्षाला ५० हजार ते ८० हजार रुपयांपर्यंत भोजन, निवास व निर्वाह भत्ता मिळणार आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गावाबाहेर राहून उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत विविध स्तरांवर शासकीय वसतिगृहे चालविली जातात. मात्र, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असताना वसतिगृहांची क्षमता अपुरी पडत आहे. त्यामुळे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्वयंम’ योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत बारावीनंतरचे उच्च शिक्षण तसेच दहावीनंतरचे दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे व्यावसायिक अथवा तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना भोजन, निवास व निर्वाहासाठी निश्चित रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या भत्त्यांचे दर २०१८ मध्ये निश्चित करण्यात आले होते. त्यात आता सुधारणा करण्यात आली आहे. याशिवाय वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी दरवर्षी ८ हजार रुपये, तर अन्य शाखांतील विद्यार्थ्यांना ४ हजार रुपये एकरकमी देण्यात येणार आहेत. ठिकाणानुसार सुधारित भत्ते - मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपूर : ८० हजार रुपये (पूर्वी ६० हजार) - इतर विभागीय मुख्यालय व ‘क’ वर्ग महानगरपालिका क्षेत्र : ६८ हजार रुपये (पूर्वी ५१ हजार) - इतर जिल्हा ठिकाणे : ५७ हजार रुपये (पूर्वी ४३ हजार) - अन्य ठिकाणे : ५० हजार रुपये (पूर्वी ३८ हजार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com