अपयशाची चव चाखलेल्या स्वप्नीलने केली यशाची हॅट्रिक!

swapnil
swapnilesakal

मालेगाव (जि. नाशिक) : आयएएस परीक्षेत चार वेळा यश मिळवूनसुद्धा मुलाखतीत मात्र यश आले नाही. पण नाउमेद न होता त्याने स्वयं अध्ययनावर भर देत स्पर्धा परीक्षा देण्याचा धडाका सुरु ठेवला आणि वर्षातच तीन वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षेत यश मिळवत मालेगावच्या स्वप्नील अहिरेने स्वतःसोबत शिक्षक माता- पित्यांची स्वप्नपुर्ती केली.

IAS परिक्षा पात्र, मुलाखतीत मात्र अपयश

स्वप्नील हा चिराई (ता. बागलाण) येथील मुळ रहिवाशी. शिक्षक मनोहर अहिरे व आशा अहिरे यांचा मुलगा आहे. यापुर्वी त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयएएस (IAS) परीक्षेत चार वेळा यश मिळवून मुलाखतीसाठी तो पात्र ठरला होता. मुलाखतीत मात्र त्याला यश आले नव्हते. नाउमेद न होता स्वयं अध्यय करण्यावर भर दिला, प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर स्वप्नीलने स्पर्धा परीक्षा देण्याचा धडाका सुरु ठेवला. सन २०२१ त्याला यशाची हॅट्रिक देऊन गेले.

swapnil
शेवग्याला विक्रमी भाव; शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर फुललं हसू

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पुन्हा कसमादेचा डंका

यापुर्वी रुरल डेव्हलपमेंटतर्फे झालेल्या स्पर्धा परीक्षेत तो उत्तीर्ण झाला. फुड कार्पोरेशन ऑफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांचा निकाल ५ ऑक्टोबरला जाहीर झाला. त्यात उत्तीर्ण होत त्याने २३ वी रँक मिळविली. ८ नोव्हेंबरला एफसीआयमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून रुजू होण्यापुर्वीच आयएफएस (IFS) परीक्षेत त्याने बाजी मारल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पुन्हा कसमादेचा डंका निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातून स्वप्नील राज्यात प्रथम आला आहे.
स्वप्नील येथील एलव्हीएच इंग्लिश मिडीयम स्कुलमधून ९३ टक्के गुण मिळवीत दहावी उत्तीर्ण झाला. बारावीला मसगा महाविद्यालयात ९१ टक्के गुण मिळवून तो प्रथम आला. यानंतर पुणे येथील सीओईपीमधून बीटेक इंजिनिअरींग केले. पाठोपाठ एमए पॉलिटीकल सायन्स केले. वादविवाद, विविध खेळांची आवड व पुस्तक वाचनाचा त्याला छंद आहे.

swapnil
महिलांनो खासगी मायक्रो फायनान्स कंपन्यांपासून सावधान

सेल्फ स्टडीच सर्वकाही

''स्पर्धा परीक्षेंसाठी हार्डवर्क, स्मार्ट वर्क महत्वाचे असते. अपयश आल्यास नाउमेद होता कामा नये. वन विभागासाठी ही माझी पहिली मुलाखत होती. दिल्ली येथील ऑनलाईन टेस्ट सिरीज वगळता मी कुठलाही क्लास केला नाही. घरीच सेल्फ स्टडीवर भर दिला. परीक्षेची तयारी चार वर्षापासून करीत होतो. सीओईपीला असल्यापासूनच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेंच्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती होती. अधिकारी होण्याचे ध्येय होते. विद्यार्थ्यांनी अभ्यास करतानाच चालू घडामोडींबद्दल जागृत राहणे व त्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.'' - स्वप्नील अहिरे, आयएफएस उत्तीर्ण (२९ वी रँक)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com