esakal | सणासुदीच्या गोडव्याला महागाईची झळ; दुध दरवाढीमुळे मिठाई महागली | Nashik
sakal

बोलून बातमी शोधा

मिठाई

सणासुदीच्या गोडव्याला महागाईची झळ; दुध दरवाढीमुळे मिठाई महागली

sakal_logo
By
तुषार महाले

नाशिक : गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंचे दरही सातत्याने वाढत आहेत. त्यात मिठाईच्या किमतीही गणेशोत्सवापासून वाढल्या आहेत. गणेशोत्सवासह नवरात्रीत मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्यानंतर दसऱ्याला बासुंदी, पेढे, मावा सर्वाधिक मागणी होत असल्याने मोठी उलाढाल होणार आहे.

मागील काही दिवसात साखर, दूध, डाळी, सिलिंडर गॅस, खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने मिठाईच्या दरात वाढ झाली असली तरी सणासुदीत गोडवा कमी झालेला नाही. मिठाईच्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसत असल्याचे चित्र आहे. मिठाईसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा कमी झाल्यामुळे मिठाईचे दर वाढले असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. स्वीट मार्ट, हॉटेलात मिठाईपासून जे दुधाचे पदार्थ बनवितात. त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. यातून एखादवेळी मिठाई खाणाऱ्याचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे मिठाई खरेदी करताना ग्राहकाने बेस्ट बिफोर बघूनच मिठाईची खरेदी करावी. गणेशोत्सवात मोदक, पेढा, मोतीचूर लाडू, बेसन लाडू या मिठाईला ग्राहक पसंती मिळाली होती. मोठी उलाढाल मिठाई बाजारात झाली होती. आता पुन्हा मागणी वाढली असली तरी पुरवठा कमी असल्याने बाजारात मिठाईची कमतरता भासणार असल्याची स्थिती आहे.

हेही वाचा: मालेगावात कॉंग्रेसला धक्का, माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर

मिठाईचे दर दुधासह कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे वाढले आहेत. दसऱ्याला बासुंदीसह, पेढा, माव्याला सर्वाधिक मागणी असते. यंदा दरात २० रुपयांची वाढ करण्यात आली असून, दूध दराच्या वाढीसह दुधाची कमतरता असल्यामुळे पुरवठा कमी केला आहे.
-अतुल देवरे, व्यावसायिक

असे आहेत दर
आता - आधी
बासुंदी - ३४० - ३२०
पेढे-मावा - ५४० - ५२०

हेही वाचा: मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, दोन ठार, एक जखमी

loading image
go to top