Nashik News : दक्षिणेत आढळले मातृपूजक संस्कृतीचे प्रतीकचिन्ह; नाशिकच्या अभ्यासकांचे यश!

Symbols of Matriarchal Culture
Symbols of Matriarchal Culture esakal

नाशिक : चेन्नईमधील इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या अधिवेशनासाठी उपस्थित असलेल्या नाशिकमधील इतिहास अभ्यासकांना दक्षिण भारतातील सहाव्या-सातव्या शतकातील महाबलीपुरम व कांचीपुरम येथील ऐतिहासिक ठिकाणावर मातृसंस्कृतीचे पूजक असलेली प्रतीक आढळून आली आहेत.

प्रतिकांमध्ये मुख्यतः ‘कोलम'चा समावेश आहे. डॉ. रामदास भोंग यांनी ही माहिती दिली. (Symbols of Matriarchal Culture Found in South success of scholars of Nashik Nashik News)

भारतामध्ये प्राचीन कालखंडापासून मातृसत्ताक संस्कृतीचा प्रभाव राहिला आहे. त्यामध्ये हडप्पा मोहंजोदाडो इथे सापडलेल्या महिला प्रतिमा, महिलांच्या आभूषणाची मुबलकत: या पुराव्यावरून अनेक तज्ज्ञांनी मान्य केले. सिंधू संस्कृती ही मातृप्रधान संस्कृती होती. या मातृप्रधानतेचा प्रभाव संपूर्ण भारतभर दिसतो.

हा प्रभाव अनेक प्रथा, परंपरा व दैनंदिन जीवनाच्या क्रिया कलापावरून दिसतो. निसर्गपूजेचे प्रतीक म्हणून मातृदेवतेची पूजा देशामध्ये वेगवेगळ्या प्रतीकाच्या रूपात केली जाते. त्याचा एक भाग म्हणून दक्षिण भारतातील तमिळनाडूमधील कांचीपुरम व महाबलीपुरम येथील मातृदेवतेच्या मंदिरामध्ये ‘कोलम' हे मातृदेवतेचे प्रतीकचिन्ह आढळून आले.

कोलम हे निसर्गातील तांदळाला म्हटले जाते. मातृपूजन सामग्रीतील घटक आहे. अधिवेशनासाठी उपस्थित असलेल्यांमध्ये डॉ. भोंग यांच्यासह प्रा. डॉ. यशवंत साळुंके, डॉ. श्रीहरी थोरवत, प्रा. अजय आहिर, प्रा. डॉ. अतुल ओहाळ, प्रा. डॉ. संजय शेलार यांचा समावेश होता.

Symbols of Matriarchal Culture
Nashik News: विद्यापीठ अधिकार मंडळाच्‍या निवडणुकीत 84 टक्‍के मतदान; नाशिक जिल्‍ह्‍यातील स्‍थिती

‘कोलम' हे दक्षिण भारतातील मातृदेवतेशी संबंधित प्रतीक मानले जाते. मद्रासमध्ये देवीची मिरवणूक निघण्याच्या वेळी मार्गावर कोलामच्या प्रतीकांची रचना केली जाते. मकरसंक्रांतीच्या दिवशी प्रत्येक महिला कोलमची आकृती काढते.

आकृतीची एक रेष पुढच्या घरापाशी नेवून सोडते. पुढची महिला तशाच प्रकारचे कोलम काढून पुढील घरापर्यंत नेवून सोडते. अशा प्रकारे सर्व गावामध्ये एक अखंड कोलम तयार होतो. कोलममध्ये वक्र रेषे इतके सरळ रेषेला तितकेच महत्त्व असते.

यावरून हे एकप्रकारचे अनोखे मातृपूजनाचे प्रतीक आपणास दिसून येते. इतर वेळेस दक्षिण भारतातील लहान मुलींना कोलम काढण्याचे प्रशिक्षण दिले जाते. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी या प्रकारचे प्रतीक आपल्याला आढळून येतात.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Symbols of Matriarchal Culture
Bhagwat karad | कुंभमेळ्यासाठी पैसे कमी पडू देणार नाही : मंत्री भागवत कराड

दक्षिण भारतात तंत्र संप्रदाय मातृपूजेत कोलमबरोबर अननस, नारळ, नाग, शंख, चक्र, पदमुद्रा, समया, दिवे आदी प्रतीक मातृपूजनामध्ये पुजली जातात, असेही डॉ. भोंग यांनी सांगितले.

माता आहे जीवनदाता

नास्ति मातृसमा छाय

नास्ति मातृसमा गतिः।

नास्ति मातृसमं त्राणं

नास्ति मातृसमा प्रपा॥

हा संस्कृत श्‍लोक आहे. अर्थात, आईसारखी दुसरी सावली नाही. तथा आईसारखा आश्रय, सुरक्षा आणि जगात जीवनदाता नाही.

Symbols of Matriarchal Culture
Chhagan Bhujbal | जातीनिहाय जनगणनेसाठी ओबीसींनी एकत्रित आवाज उठवण्याची गरज : छगन भुजबळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com