E Peek Pahani : 'ई-पीकपाहणी' ठप्प होणार! लॅपटॉप-प्रिंटरसाठी राज्यातील १५ हजार तलाठ्यांचा सोमवारपासून ऑनलाइन कामकाजावर बहिष्कार

Indefinite Strike by Maharashtra Talathis : राज्यातील १५ हजार तलाठ्यांनी नवीन लॅपटॉप व प्रिंटर उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून बेमुदत ऑनलाइन कामबंद आंदोलनाची घोषणा केली आहे, ज्यामुळे डिजिटल सातबारा, ई-पीकपाहणीसह सर्व महसुली कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.
E Peek Pahani

E Peek Pahani

sakal 

Updated on

नाशिक: नवा लॅपटॉप आणि प्रिंटर मिळण्यासाठी वारंवार विनंती करूनही शासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने राज्यातील १५ हजार तलाठ्यांनी बेमुदत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. येत्या सोमवार (ता. १५)पासून हे सर्व तलाठी ऑनलाइन कामकाजावर बहिष्कार टाकणार असून, ई-पीकपाहणी, डिजिटल सातबारा, ई-फेरफारसह सर्व संगणकीय प्रक्रिया रखडणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com