
नाशिक : सप्तशृंग गडावर गुढी उभारत तनिष्कांनी केला महिला सुरक्षेचा जागर
वणी (जि. नाशिक) : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावर आज 'सकाळ' माध्यम समूहाच्या 'तनिष्का' व्यासपीठाच्या नवव्या वर्धापनदिनी तनिष्का सदस्यांनी आदीशक्ती सप्तशृंगी मंदीरात गुढी उभारत महिला सुरक्षा, स्वच्छता व प्लास्टीक मुक्तीचा जागर केला.
सप्तशृंगी गडावर तनिष्का व्यासपीठाचा वर्धापन दिन व गुढीपाडवा निमित्त दरवर्षी भगवती मंदीरात सप्तशृंगी गडावरील तनिष्का सदस्या गुढी उभारत नव संकल्प करतात. गेली दोन वर्ष कोविडमुळे भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद असल्यामुळे तनिष्कांना सलग दोन वर्षे गुढी उभारता आलेली नव्हती. मात्र आज देवीची पंचामृत महापुजा व आरती संपन्न झाली. यानंतर देवी मंदीरातच सप्तशृंगी गडावरील तनिष्का गटप्रमुख मनिषा बेनके, स्वाती पवार, रूपाली राऊत, पल्लवी कडवे, सविता बेंद्रे, मंगला सोमासे, दुर्गा बेनके आदींनी आकर्षक वस्त्र व फुलहारांनी सजवलेली गुढी उभारली. यावेळी तनिष्का सदस्यांनी महिला सुरक्षिततेची, पर्यावरण रक्षण व सप्तशृंगी गड प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प करीत देवीचा जागर केला.
हेही वाचा: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने लखलखले; दरात तेजी तरी खरेदीचा उत्साह

वणी बसस्थानकात तनिष्का सदस्यांच्यावतीने भाविक व प्रवाशांचे स्वागत फलकाचे अनावरण प्रसंगी उपस्थित मान्यवर.
वणी बसस्थानकात स्वागत फलकाचे अनावरण
तनिष्का व्यासपीठाच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त आदिशक्ती सप्तशृंगी मातेचे मुळरुप समजले जाणाऱ्या वणी गावातील श्री जगदंबा माता मंदीरात गुढी उभारुन गुढीपुजन तसेच वणी बसस्थानकात तनिष्का सदस्यांच्यावतीने भाविक व प्रवाशांचे स्वागत फलकाचे अनावरण दै. 'सकाळ' उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
हेही वाचा: उन्हाच्या तडाखा वाढला; नाशिक जिल्ह्यात 53 टक्के पाणीसाठा
यावेळी सप्तशृंगी देवी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, कोषाध्यक्ष अमोल देशमुख, विश्वस्त रमेश देशमुख, गणेश देशमुख, पोलिस उपनिरीक्षक प्रविण उदे, महिला पोलिस रंजना गोडे, वनिता अहिरे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रविकुमार सोनवणे, गुरदत्त पतसंस्थेचे चेअरमन भास्करराव फुगट, तैलिक समाज मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, गणेश महाले, तनिष्का गट प्रमुख मिना पठाण, सविता सोमवंशी, कौशल्या पवार, ग्रामपंचायत सदस्या शकुंतला कोकाटे, मंगला चौधरी, शुभांगी पाटोळे, मालती गांगुर्डे, स्मिता दशपुते आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
Web Title: Tanishka Anniversary And Gudi Padwa Festival Celebrated By Tanishka Members
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..