राज्य बालनाट्य स्पर्धेत तनिष्का पेंढारकरला रौप्य पदक

राज्य बालनाट्य स्पर्धेत तनिष्का पेंढारकरला रौप्य पदक
Published on: 
फोटो : 34525 नंदुरबार : तनिष्का पेंढारकरला रौप्यपदक प्रदान करताना अभिनेत्री नयना आपटे. शेजारी नागसेन पेंढारकर. ------------- राज्य बालनाट्य स्पर्धेत तनिष्काला रौप्यपदक नंदुरबार, ता. ५ : राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत उत्कृष्ट अभिनय करणारी नंदुरबारातील तनिष्का पेंढारकर रौप्यपदकाची मानकरी ठरली. अभिनेत्री नयना आपटे यांच्या हस्ते मुंबईत झालेल्या कार्यक्रमात तिला रौप्यपदक प्रदान करण्यात आले. सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २२ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे पारितोषिक वितरण मुंबई येथे झाले. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे उपस्थित होत्या. या वेळी नंदुरबारच्या गाडगेबाबा सेवा मंडळातर्फे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत नागसेन पेंढारकरलिखित ‘स्वराची कहाणी’ हे बालनाट्य सादर झाले. या बालनाट्याची जळगाव केंद्रात अंतिम फेरीसाठी निवड झाली. अमरावतीत झालेल्या अंतिम फेरीत या बालनाट्यातील प्रमुख कलाकार तनिष्का पेंढारकरला उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक जाहीर झाले. बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ॲड. नीलम शिर्के-सामंत, नाट्य परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, अभिनेते दिगंबर नाईक, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर, सहसंचालक श्रीराम पांडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.