tanker dumping chemicals in Mukne river basin was caught red handed by farmers nashik news
tanker dumping chemicals in Mukne river basin was caught red handed by farmers nashik newsesakal

Nashik News : नदीपात्रात केमिकल सोडतांनाचा टॅंकर शेतकऱ्यांनी रोखला

Published on

Nashik News : साकुर फाटा ते नाशिक मुंबई महामार्गाला जोडणाऱ्या महामार्ग क्र.३७ वरील नांदगाव बु येथील पाची पुलावरुन मुकणे नदीपात्रात केमिकल युक्त रसायन सोडतांनाचा टॅंकर येथील शेतकऱ्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास रंगेहाथ पकडला आहे. (tanker dumping chemicals in Mukne river basin was caught red handed by farmers nashik news)

esakal

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत जमावाच्या हातून निसटून चालक फरार झाला आहे.

आज मध्यरात्री सव्वा दोन वाजता टॅंकर क्र.MH.04 HD 4530 मुकणे नदीवरील पाचीपूलावर थांबला पाईपद्वारे केमिकल युक्त रसायन नदीपात्रात सोडल्याचा संशय पुलाशेजारील शेतकऱ्यांना आला संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली केमिकल सोडण्यापासून रोखले काही जणांनी चालकास ताब्यात घेत विचारपूस केली सुमारे तीस हजार लिटर क्षमतेने काठोकाठ भरलेला टॅंकर नदीपात्रात सोडले जात होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

tanker dumping chemicals in Mukne river basin was caught red handed by farmers nashik news
Nashik News : वक्फ संस्थाविश्वस्तांना द्यावा लागणार वार्षिक अर्थसंकल्प; 30 दिवसांची मुदत
शेतकऱ्यांनी केमिकल सोडण्यापासून रोखले
शेतकऱ्यांनी केमिकल सोडण्यापासून रोखले esakal

सदर घटनेची माहिती पाटबंधारे विभागास कळविल्यानंतर मुकणे धरणाचे लघुपाटबंधारे शाखाधिकारी विजय ठाकूर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. पाहणी करुन पाण्याचे नमुने घेत प्रदूषण नियामक मंडळाकडे पाठविणार असून संबंधित टॅंकर मालकावर वाडीवऱ्हे पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कॅन्टोमेन बोर्डाचे नगरसेवक तानाजी करंजकर यांनीही भेट दिली. यावेळी नांदगाव बु सरपंच देवा मोरे,नरेश आवारी,विकास मुसळे,सुदाम यंदे, शाताराम गायकवाड, केशव दिवटे,विलास काजळे, कुंडलिक मुसळे आदी शेतकरी उपस्थित होते.

tanker dumping chemicals in Mukne river basin was caught red handed by farmers nashik news
Nashik News : पालखेडला तरूण शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com