पंचवटी- तपोवन परिसरात दर शनिवारी-रविवारी दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, सध्या दर आठवड्याला सरासरी तीन ते चार दुचाकींची चोरी होत आहे. त्यामुळे पर्यटक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिस प्रशासनाने चोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी युनिटी फाउंडेशनच्या अध्यक्षा ॲड. एकता कदम यांनी केली.