Nashik Municipal Corporation
sakal
नाशिक: साधुग्रामसाठी तपोवनात ३५० एकरापेक्षा अधिक अतिरिक्त जागा देण्यास जागामालकांचा विरोध असताना दुसरीकडे महापालिकेने ५० टक्के टीडीआर व ५० टक्के रोख स्वरूपात मोबदला देण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी धुडकावून लावला. यामुळे महापालिका प्रशासन अडचणीत सापडले आहे. बाजारमूल्य तक्त्यातील दर हा मुळातच कमी असून, साधुग्रामच्या आजूबाजूला असलेल्या शिवारातील बाजारमूल्य दरापेक्षा अधिक दर शेतकऱ्यांनी मागितला आहे.