Tree Cutting
sakal
नाशिक: पंचवटी विभागातील तपोवनात साधुग्रामच्या जागेतील एक हजार ८२५ वृक्षतोड प्रकरणी महापालिकेच्या उद्यान विभागावर हरकतींचा मारा झाला. यानंतर बॅकफूटवर गेलेल्या महापालिका प्रशासनाने साधुग्राम उभारण्यासाठी ले-आउट तयार केला नसल्याची बाब समोर आली आहे. त्यापूर्वीच अदांजे वृक्षतोड करून जमीन सपाटीकरणाचा लावलेला सपाटा झाडांच्या मुळावर उठला आहे.