Aditya Thackeray
sakal
नाशिक: भाजपचे प्रेम ना वनावर, ना तपोवनावर, ना धर्मावर...भाजपचे प्रेम फक्त ठराविक ठेकेदारावरच आहे, असा तीव्र आरोप युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. तपोवनातील वृक्षतोड ही लाडक्या ठेकेदारासाठी रचलेली खेळी असून, नाशिककरांवर भाजपची दादागिरी सुरू असल्याचाही त्यांनी आरोप केला. ‘तपोवन वाचले पाहिजे; तपश्चर्येचे हे वन आम्ही ठेकेदारांच्या ताब्यात जाऊ देणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला.