Devendra Fadnavis vs Ajit Pawar
sakal
नाशिक: तपोवनातील वृक्षतोडीचा वाद आता थेट सत्ताधारी पक्षाच्या अंतर्गत राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू ठरत आहे. साधुग्राम उभारणीसाठी सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींसह अनेक संघटना विरोध करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासासाठी वृक्षतोडीचे समर्थन केले होते. मात्र त्याच सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पर्यावरणरक्षणाच्या भूमिकेला उघड पाठिंबा दिल्याने या प्रश्नावरून सत्तेतच दोन भिन्न भूमिका स्पष्टपणे दिसू लागल्या आहेत.