Tapovan Tree
sakal
नाशिक: तपोवनातील साधुग्राममध्ये ३३ एकर क्षेत्रात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर २२० कोटी रुपये खर्च करून कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र (एक्झिबिशन सेंटर) उभारण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्याची घोषणा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी केली. नाशिककरांचे समाधान होत नाही आणि १५ हजार पर्यायी वृक्षलागवड केले जात नाही, तोपर्यंत वृक्ष तोडले जाणार नसल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.