Siddhababa
sakal
पंचवटी: महाराष्ट्रात केवळ नाशिक, त्र्यंबकेश्वर येथेच सिंहस्थ कुंभमेळा भरतो. प्रभू श्रीरामचंद्रांनी वास्तव केलेली ही तपोभूमी जगभरातील साधू-संत, महंत ऋषी आणि भाविकांसाठी आस्थेचे ठिकाण आहे. हा परिसर संतपरंपरा आणि निसर्गाची देणगी असलेले पवित्र क्षेत्र आहे. येथे कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक कॉम्प्लेक्स अथवा बांधकाम होऊ नये, असेच सर्वांचे मत आहे. या भूमीत फक्त संत, महंत आणि हरित वनस्पतींचे अस्तित्व राहिले पाहिजे, वृक्षतोडप्रश्नी प्रशासनाने साधूंना रस्त्यावर उतरायला लावू नये, असा इशारा नेपाळ येथील पीठाधिश्वर जगद्गुरु महायोगी रामानंद आचार्य सिद्धबाबा यांनी दिला आहे.