Tapovan
sakal
नाशिक: तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीच्या विरोधात वीस दिवसांपासून तपोवनात वेगवेगळी आंदोलने सुरू असून, रविवारी (ता. ७) दिवसभरात अनेक कार्यक्रम तसेच आंदोलने होणार आहेत. यात कविसंमेलन, लोकनृत्य, संगीताचा कार्यक्रम तसेच खो-खोपासून कबड्डीपर्यंत खेळ, योगासने यांसह व्याख्यानाच्या कार्यक्रमाचाही समावेश आहे.