Tapovan Tree Cutting Protest
Sakal
नाशिक: कुंभमेळ्यादरम्यान येणाऱ्या साधु-महंतांसाठी प्रस्तावित असलेल्या साधुग्रामसाठी हजारो वृक्षांची कत्तल करण्यात येणार असल्याचे जाहीर झाल्यापासून त्यांच्या सुरक्षिततेसाठी जो-तो पर्यावरणवादी आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे. रविवारी (ता. ३०) मात्र या वृक्षांच्या बचावासाठी पर्यावरणप्रेमी नाशिककर एकवटून तपोवनात जमले.