Tapovan
sakal
नाशिक: ‘झाडे वाचली तरच माणूस वाचेल’ असा संदेश रविवारी (ता. ७) तपोवनाच्या वृक्षराईत झालेल्या पहिल्या शोकसंमेलनाने दिला. या संमेलनात महाराष्ट्रातील अनेक नामवंत कवींनी आपली उपस्थिती नोंदविली. प्रारंभी बारामती, पुणे येथून आलेले राजन खान यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व विशद करून झाडांसंदर्भातील सरकारची उदासीनता भाषणातून व्यक्त केली.