NMC Recruitment : महापालिकेत कुठल्याही भरतीसाठी ‘टाटा’ला पसंती! 3 वर्षाचा करार

tcs
tcsesakal

NMC Recruitment : राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता महापालिकेत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेमार्फतच भरती होणार आहे. या संदर्भातील अंतिम मसुद्याला प्रशासनाने अंतिम मंजुरी दिली असून, पुढील तीन वर्षासाठी नोकर भरतीचा करार केला जाणार आहे.

महापालिकेत कुठल्याही प्रकारची भरती आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसमार्फतच होईल. (Tata preferred for any recruitment in NMC 3 year contract nashik news)

महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर सात हजार ८२ पदे मंजूर आहेत. त्यातील २८०० पदे विविध कारणांमुळे रिक्त झाली आहेत. त्यामुळे महापालिकेला कामकाज करताना अडचणी येतात. अपुरे मनुष्यबळ असल्याने एका टेबलवर दोन ते तीन टेबलाचे काम केले जाते.

यामुळे कर्मचारी देखील तणावात काम करतात. अभियंता संवर्गामध्ये एका अभियंत्याकडे दोन ते तीन विभागांचा कार्यभार आहे. यामुळेदेखील कामकाजावर परिणाम होतो. कोरोना पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून वैद्यकीय व अग्निशमन विभागातील ७०४ पदांची भरती करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.

मात्र, नोकर भरती करताना टीसीएस किंवा आयबीपीएस या संस्थांमार्फतच भरती करावी, अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना आहेत. महापालिकेकडून आयबीपीएस संस्थेने प्रस्ताव दिला होता. सुरवातीच्या काळात टीसीएसने महापालिकेच्या प्रस्तावाला प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

tcs
NMC Recruitment : स्वच्छता सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीला स्थगिती

परंतु दुसरीकडे आयबीपीएस संस्था व महापालिका प्रशासनात अटी व शर्तीवरून मतभेद निर्माण झाल्याने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमार्फत भरती करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी टीसीएस संस्थेच्या प्रतिनिधीसोबत चर्चा केली व कराराचा अंतिम मसुदा तयार केला.

कराराला मान्यता मिळाली असून, पुढील आठवड्यात करारनाम्यावर स्वाक्षरी होईल. त्याअनुषंगाने पुढील तीन वर्षासाठी टीसीएस कंपनीकडे भरतीचे सर्वाधिकार राहतील.

"राज्य शासनाच्या सूचनेनुसार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेसमवेत करार केला जाणार आहे. पुढील तीन वर्षासाठी हा करार राहील."

- मनोज घोडे-पाटीत, प्रशासन उपायुक्त, महापालिका.

tcs
Unseasonal Rain Damage : तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने बळीराजावर संकट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com