

TCS Nashik Case: Office Shut Amid Probe
esakal
नाशिक : धर्मांतरणाच्या गंभीर आरोपांसह लैंगिक छळाच्या घटनांमुळे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) च्या नाशिक कार्यालयातील कामकाज पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. परिसरात हालचालींवर कडक निर्बंध लादण्यात आले असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता आंतरराष्ट्रीय संबंध आणि संभाव्य निधीपुरवठ्याच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
पोलिसांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात निधीपुरवठ्याचे संभाव्य मार्ग आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांची सखोल तपासणी सुरू आहे. याबाबत एटीएस आणि एनआयए यांना पूर्ण माहिती देण्यात आली असून, तपासादरम्यान समोर येणाऱ्या कोणत्याही नव्या माहितीचा काटेकोर पाठपुरावा करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.